शिर्डी/प्रतिनिधी :- राहाता हद्दीत रात्रीचे वेळी घरफोडया करणा-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर यांनी मुददेमालासह जेरबंद केले आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की श्री रविंद्र बाळासाहेब पाडेकर, धंदा व्यापार, रा. साकुरी ता राहता जि.अ.नगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून त्यांचा साईराज फर्निचर अँन्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकान कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचा छताचा पत्रा कापुन आत प्रवेश करुन दुकानातील ७३,०००/- रु किमतीचे चार नवीन मोबाईल फिर्यादी यांचे संमती शिवाय चोरुन नेले. अशी फिर्यादी त्यांनी दिनांक १/१०/२०२० रोजी राहाता पो.स्टे येथे दिली होती त्यावरुन राहाता पो.स्टे. गु.र.नं. ६०९/२०२० भा द वी कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

आज दिनांक ०६/१०/२०२० रोजी सदर गुन्हयाचा पोनि/दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे मदतीने राहाता हददीत समांतर तपास करत असतांना पो.नि. दिलीप पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, सदरचा गुन्हा हा संजय अर्जुन पाटील रा. सुनिल त्रिभुवन यांचे भाडोत्री खोली, बाजारतळ कालीकानगर, शिर्डी, ता राहता जि. अ.नगर याने केला असुन तो सदर ठिकाणी लपुन बसल्याची माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि. शिशीरकुमार देशमुख, पोहेकॉ/मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना/संतोष लोढे, सचिन आडबल, दिपक शिंदे, संदिप दरंदले, प्रकाश वाघ, चापोना/अर्जुन बडे अश्यांनी मिळुन सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे संजय अर्जुन पाटील वय ४५, रा. सुनिल त्रिभुवन यांचे भाडोत्री खोली, बाजारतळ ‘कालीकानगर, शिर्डी, ता राहता जि. अ.नगर; मुळ रा. शिवाजीनगर, अंमळनेर, जि. जळगाव यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर गुन्हया बाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन गुन्हयातील मालापैकी, ५४,०००/- मुददेमाल त्यात विवो कं. चे दोन मोबाईल व ओपो कं. चा एक मोबाईल असे एकुण तीन मोबाईल जागीच काढुन दिल्याने ते जागीच जप्त करुन सदर आरोपीस अधिक विश्वासात घेवुन याप्रकारचे गुन्हयां बाबत विचारपुस करता त्याने दिनांक २३/०८/२०२० रोजी रात्री नगर मनमाड हायवे रोडवर, साकुरी शिवार, सिध्द संकल्प लॉन्स समोर, राहता येथे मु्था ट्रेडर्स प्लंबींग नावाचे दुकानाचे छताचा पत्रा कापुन सदर दुकानातील रोख रक्‍कम व प्लंबीगचे सामान चोरल्याचे सांगितले त्याबाबत राहाता पो.स्टे. येथे चौकशी करता सदर बाबत राहाता पो.स्टे. गु.र.नं.1 ४२४/२०२० भादवी कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी यास मुददेमालासह राहाता पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास राहाता पो.स्टे.करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, व मा. श्री.संजय सातव सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी
विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पुढील तपास करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here