श्रीरामपुर/प्रतिनिधी :- गोरगरिबांच्या लाईट बिलामध्ये दहा दिवसात दुरुस्ती न झाल्यास एमआयडीसी उपकेंद्रस भिम शक्ती संघटना व नागरिकांच्या वतीने टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर यांनी उपकेंद्राचे अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे लॉकडाउन च्या तीन महिने काळामध्ये सर्व काम व व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आधार म्हणून विज बिल माफ करण्याचा राज्य सरकार विचाराधीन होते परंतु काही कारणास्तव ते शक्य नसल्याने दोन ते तीन टप्प्यात बिल भरण्यास तात्पुरती मुभा दिली आहे परंतु दत्तनगर टिळक नगर सूतगिरणी आंबेडकर वसाहत या भागांमध्ये सर्वसामान्य व हातावर पोट भरणारे लोक राहतात संपूर्ण लॉक डाऊन च्या काळात एकदा देखील रिडींग न घेता अव्वाच्या सव्वा बिल सर्वसामान्य च्या माथी मारण्याचे काम महावितरण केले आहे येथील काही व्यवसायिकांना तीन महिने व्यवसाय बंद असून सुद्धा पाच ते सहा हजार बिल आले आहे सरकारने कमर्शिअल मीटर भाड्यात सूट देऊ असे सांगितले असे असून सुद्धा जादा दराचे बिल आले आहे घरामध्ये मीटर बंद असून सुद्धा हजारो रुपयाचे बिल येतात कसे हा आमचा महावितरणला सवाल आहे व आपल्या भोंगळ कार बारा संदर्भात गावात लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे लोक वैतागले आहेत त्यामुळे आपण लॉक डाऊन च्या काळामधील आलेल्या बिलामध्ये दहा दिवसात दुरुस्ती करावी अन्यथा भीमशक्ती संघटना व नागरिकांच्या वतीने कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे भीमशक्तीचे सुनील संसारे अमोल काळे विनोद यादव सनी बारसे सचिन खांडरे संदीप गायकवाड आदींनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here