श्रीरामपुर(प्रतिनिधी) :- श्रीरामपुर तालुक्यातील भामठाण येथील अडभंगनाथ देवस्थानाला भेट दिली यावेळी बोलताना सांगितले आज मला अडबंगनाथ तपशिळा दर्शन घेऊन खूप समाधान प्राप्त झालं कारण अडभंगनाथ यांच्या दर्शनाने मन आणि शांती प्राप्त झाली हा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रपंचात व्यवहार काम करताना अत्यंत सैरावैरा धावणारे मन त्याला शांती देण्याचे ठिकाण म्हणजे अडभंगनाथ संस्थान भामाठाण आहे. योगायोगाने अडभंगनाथ तपशिळे चे दर्शन मला झाले, अत्यंत समाधान वाटलं. मंदिर परिसरातील अत्यंत सुंदर वातावरण आणि मंदिरातील अत्यंत सुंदर असणारी चित्रकला त्याठिकाणी संपूर्ण अडभंगनाथ यांचे जीवन चरित्र आणि सद्गुरू नारायणगिरी महाराज यांनी दाखवून दिलेली ही भूमी स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांनी अत्यंत श्रद्धापुर्वक निर्माण केलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर सुंदर परिसर निसर्गरम्य वातावरण हजारो वर्षाची अडबंगनाथ यांची तपशिळा हजार वर्षापूर्वीची विहीर बारव अत्यंत प्राचीन भूमी असूनही दुर्लक्षित पडलेली होती. या भूमीत सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांनी अरुणनाथगिरीजी महाराज सारखे हिरा रत्न आपल्याला दिलेला आहे, हे आपल्या सर्वांचे भाग्यच आहे. आज मला येथे दर्शन घेऊन माझ्या मनात काही शंका होत्या काही मनात गोंधळ होता तो ही या ठिकाणी निरासन झाला आहे. आणि ती मनातील शंका दूर झालेली आहे. मी श्रीरामपूर तालुका आरोग्य अधिकारी या पदावर काम करताना अत्यंत धावपळ होत असते. आणि अशा वेळेस अडभंगनाथांच दर्शन घेऊन मनाला समाधान प्राप्त झालं स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्यासमवेत एक-दीड तास मी चर्चाही करून मला खूप बरं वाटलं, खरं तर आपल्या नगर जिल्ह्यात इतक्या जुन्या इतिहासातील हे ठिकाण अजून काही लोकांना माहीत नाही, आपण सर्वांनी एकदा तरी या ठिकाणी येऊन भेट द्यावी, दर्शन घ्यावे. याठिकाणी अन्नदान सेवा चालू असते आपणही करावी, आणि पुण्य प्राप्त करून घ्यावं असं मला वाटतं, आज या ठिकाणी श्रीरामपूर येथील माझ्यासमवेत गजानन हार्डवेअर चे मालक अर्जुन भाई पटेल साहेब तेही इथे उपस्थित होते त्यांचेही धन्यवाद

भामठाण येथील अडभंगनाथ देवस्थानचे मठातीपती स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्याशी चर्चा करूनही अत्यंत समाधान प्राप्त झाले. :- तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहनराव शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here