शिर्डी/प्रतिनिधी :- उत्तरप्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंदा पा येथे राहणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या तरूणीवर काही सैतानी प्रवृत्तीच्या लोकांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार करून तिची जिभ कापली व पाठीच्या कणाचे हाड मोडले व त्याच्यावर विविध प्रकारच्या शारीरिक वेदना देवून तिची अमानुष्यपणे हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशी गंभीर स्वरूपाची घटना घडलेली असतांना स्थानिक पोलीस प्रशासनाने पिडीत कुटूंबाची फिर्याद वेळीत घेऊन आरोपींवर कारवाई केली नाही. त्यामुळे या सैतानी प्रवृत्तीचे लोक खुलेआम फिरत आहे. जर वेळेत पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असती तर आरोपी आज जेरबंद झाले असते. ज्या पोलिसांनी फिर्द्याद घेण्यास टाळाटाळ केली व व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न कळवता मुलीची अंत्यविधी परस्पर पोलिसांनी केल्याने स्थानिक पोलिस आरोपींना पाठीशी घालून त्यांना सहकार्य करतात असे जाणवते अशा निष्क्रिय व बेजबाबदार पोलिसांना त्वरीत निलंबित करुन या घटनेत सहआरोपी करून या सर्वांना कठोर शासन करुन भरचौकात लोकांसमोर फाशीची शिक्षा करण्यात यावी व पिडीत कुंटूबियांना आर्थिक मदत करून त्यांच्या घरच्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी पिडीत कुटूंबियांना लवकर न्याय न मिळल्यास राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन देत्या प्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सुनील जगताप म्हणाले
याप्रसंगी महिला आघाडी च्या शोभा पवार, जिल्हासचिव ज्ञानेश्वर बनसोडे, रविंद्र लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे आदी उपस्थित होते