रांजणखोल/वार्ताहर (भाऊसाहेब जाधव) :- उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस जिल्ह्यामध्ये तरुणीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या उत्तरप्रदेशातील पोलिस व सरकारचा रांजणखोल व टिळकनगर येथे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला युपी येथील हाथरस जिल्ह्यातील चंदा पा येथे राहणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या तरूणीवर काही सैतानी प्रवृत्तीच्या लोकांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार करून तिची जिभ कापली व पाठीच्या कणाचे हाड मोडले व त्याच्यावर विविध प्रकारच्या शारीरिक वेदना देवून तिची अमानुष्यपणे हत्या करण्यात आली. ही घटना
माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशी गंभीर स्वरूपाची घटना घडलेली असतांना स्थानिक पोलीस प्रशासनाने पिडीत कुटूंबाची फिर्याद वेळीत घेऊन
आरोपींवर कारवाई केली नाही. त्यामुळे या सैतानी प्रवृत्तीचे लोक खुलेआम फिरत आहे. जर वेळेत पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असती तर आरोपी आज जेरबंद झाले असते. ज्या पोलिसांनी फिर्द्याद घेण्यास टाळाटाळ केली व व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न कळवता मुलीची अंत्यविधी परस्पर पोलिसांनी केल्याने स्थानिक पोलिस आरोपींना पाठीशी घालून त्यांना सहकार्य करतात असे जाणवते अशा निष्क्रिय व बेजबाबदार पोलिसांना त्वरीत निलंबित करुन या घटनेत सहआरोपी करून या सर्वांना कठोर शासन करुन भरचौकात लोकांसमोर फाशीची शिक्षा करण्यात यावी व पिडीत कुंटूबियांना आर्थिक मदत करून त्यांच्या घरच्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी पिडीत कुटूंबियांना लवकर न्याय देण्यात यावा अशी मागणी करुन निषेध व्यक्त करण्यात आला रांजणखोलचे सरपंच चागंदेव ढोकचौळे,उपसरपंच जाकिर शेख,सिद्धार्थ बागुल, दिपक दळवी, बाबासाहेब कटारनवरे,संदीप यादव,गौतम निळे, सचिन राठोड,अनिल माघाडे,शामराव आवारे, शफिभाई पठाण,किशोर कोळगे, बाबासाहेब साळवे,सागर ढोकचौळे,पत्रकार भाऊसाहेब जाधव,आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here