रांजणखोल/वार्ताहर (भाऊसाहेब जाधव) :- राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे काल मंगळवार दि.६ रोजी एकाच कुटुंबातील चक्क ३ जण कोरोना पाॅझीटिव आढळून आले आहेत रॅपीङ टेस्टमध्ये नवीन कोरोना रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असल्याची माहिती राहाता तालुका येथील ग्रामीण रुग्णालयाचे सामुदायिक आरोग्य अधिकारी  ङाॅ. प्रकाश म्हस्के यांनी दिली कोरोना पाॅझीटिव रुग्णांच्या  घरातील सर्व जणांची  रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे रांजणखोल परिसर पुन्हा लाॅकङाऊन करण्याची मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे नागरिकांनी संयम बाळगत करोनाचा प्रकोप टाळण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे पालन करावे  रांजणखोल परिसरात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक प्रभावी उपाययोजना  वेळोवेळी औषध फवारणी करण्यात येत आहे बाहेरील नागरिकांना गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे रांजणखोल परिसरात विनाकारण नागरिकांनी फिरु नये तोंङाला मास्क लावावे असे आवाहन सरपंच चांगदेव ढोकचौळे यांनी केले आहे  रांजणखोल आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी याकामी परिश्रम घेत आहेत घरोघरी जावुन आजारा संदर्भात माहिती घेत आहे याकामी वैद्यकीय अधिकारी ङाॅ प्रकाश म्हस्के  यांचे सहकार्य लाभत आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here