श्रीरामपूर – बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये हाथरस (उत्तर प्रदेश) येथिल अनुसूचित जातीच्या तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली व पोलीस प्रशासनाने पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह रात्रीतून जाळण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, त्याच बरोबर उत्तर प्रदेश मधील आजमगड बलरामपूर व बिहारमध्येही अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत या सर्व अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी तात्काळ लक्ष घालून या सर्व ठिकाणी आरोपींना तात्काळ अटक करून लवकरात लवकर फाशी शिक्षा देण्यात यावी यासाठी संपूर्ण भारतामध्ये धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. याचाच भाग म्हणून येथील गांधी पुतळा या ठिकाणी ही धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी भारत मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती ,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ,राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा, संविधान बचाव समिती, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बहुजन क्रांती मोर्चा चे संयोजक एस के चौदंते, राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाचे जिल्हा संयोजक आर एम धनवडे, बामसेफचे प्रचारक रमेश मकासरे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी, संविधान बचाव समितीचे चे डॉ. सलीम शेख इत्यादींनी या घटनेचा निषेध करून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. निवेदनावर सुधाकर भोसले, एम एस गायकवाड, पोपट खरात, नवनाथ साळवे, बाबासाहेब थोरात, सर्जेराव देवरे, अर्जुन मोरे, शाकीर शेख, बापू वैराळ आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here