श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील महाले सुवर्णनिधी लिमिटेडने ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना सुरू केलेल्या असून त्याद्वारे ग्राहकांना भविष्यासाठी बचत करण्याची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. बँकींग समूहास सहाय्यभूत ठरणारां हा मेगा प्रकल्प असल्याचे संचालक सचिन महाले यांनी सांगितले.

अवघड वाटणारे कॉर्पोरेट मिशन सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरणार आहे. दैनंदिन जीवनातील धावपळीत भविष्याचा विचार करणे मनुष्य विसरून जातो. भविष्यासाठी बचतीकडे दुर्लक्ष करतो. यासाठीच धावपळीच्या जीवनात भविष्याची काळजी करण्यासाठी महाले सुवर्ण निधीच्या माध्यमातून ‘बचतीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

यामध्ये रोख रक्कमेच्या वृध्दिसाठी विविध कालावधींच्या जमा योजना सुरू केलेल्या आहेत. त्याचबरोबर फक्त पाच मिनिटांत सोने तारण कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी श्रीरामपूर बरोबरच गोधवणी, टाकळीभान, पाचेगाव, नेवासा, राहूरी, वैजापूर, राहाता, संगमनेर, दत्तनगर, कोल्हार, पुणतांबा, बेलापुर येथेही महाले सुवर्णनिधीचे कलेक्शन सेंटर सुरू केले आहे. येत्या पाच वर्षात एक कोटी ग्राहकांचे भविष्य सुरक्षीत करण्याचा संकल्प असून ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सचिन महाले यांनी केले आहे.

महाले सुवर्णनिधी लिमिटेडने १०० रुपये किंवा १०० च्या
पटीत. रक्कम स्वीकारून सभासद करण्यात येत असून सभासदांना महाले सुवर्णनिधी लिमिटेडचे शेअर्स देखील दिले जातात. त्यांचे आतापर्यंत ६ हजारांच्या व॑र सभासद असून ‘आतापर्यंत हजारो ग्राहकांना गोल्ड लोन उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच ठेवीदारांना अँक्सिडेंटल इन्शुरसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

सर्वसामान्यांच्या मनात या कंपनीने एक वेगळे स्थान निर्माण करून बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्यांच्या गदारोळात आजही महाले सुवर्ण निधी कंपनीने आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here