श्रीरामपुर(प्रतिनिधी) :- एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपुर तालुक्‍यात रविवार (दि.११) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी अज्ञात इसमाने विरुद्ध
श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. ३६३ या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणी मुलीच्या आईने श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती

श्रीरामपुर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.११) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक चौक वार्ड नंबर ३ येथुन त्यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावुन तीचे अपहरण केले.

याबाबत माहिती मिळताच फिर्यादी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवुडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here