श्रीरामपूर शहर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्रीहरी बहीरट साहेब यांनी एकलहरे परिसरात पन्नास लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर जिवघेणा विषारी गुटखा पकडुन शेकडो युवकांचे प्राण वाचविण्याचे उत्कृष्ट कर्तव्य पार पाडुन महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतांनाही अवैध गुटखा विक्री करणारया नराधमांवर कठोर कारवाई करुन व्यसनमुक्ती सारखे अभिमानास्पद उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अन्याय अत्याचार निर्मूलन समिती श्रीरामपूर शहर व अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांच्या वतीने दबंग पोलीस निरीक्षक मा.बहीरट साहेब यांचा शाल फेटा हार व गुलाबपुष्प देवुन समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मा.बहीरट साहेब यांनी श्रीरामपूर शहरात अवैध व बेकायदेशीर धंदेवाईकांचे धाबे दनानुन सोडले असुन महीलांवर होणारया अन्यायाविरुद्धही न्याय देण्याच्या कामाचेही या वेळी कौतुक करण्यात आले. श्रीरामपूर शहरात पकडलेल्या बेकायदेशीर विषारी गुटख्यातील आरोपींना बहीरट साहेब यांनी पाठीशी न घातल्यामुळे संबधित गुन्हेगारांकडून भाडोत्री व खोट्या तथाकथित गुन्हेगारी प्राश्वभुमी असलेल्यांकडुन हेतुपुरस्सर बदनामीकारक वृत्त व खोट्या तक्रारी करुन वरिष्ठ पोलीस अधीकार्यांची दिशाभूल करणाऱ्यांच्या विरुद्ध अन्याय अत्याचार निर्मुलन समिती उग्र निदर्शने करुन कर्तव्यदक्ष पोलिसांच्या पाठीशी उभी राहील असे अभिवचन प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्र दादा जाधव यांनी या प्रसंगी दीले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्षा सौ.रमादेवी धिवर, युवाजिल्हाध्यक्ष निखिल भोसले,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वसंतराव वाघ, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रदीपनाना गांगुर्डे, भारत गवई, जिल्हा कार्याध्यक्ष शोभाताई पातारे, जानमोहम्मद शेख, श्रीरामपूर ता.अध्यक्ष रितेशभाऊ एडके, रहाता तालुकाध्यक्षा शकुंतला तांबे,श्रीरामपूर शहरप्रमुख दत्तात्रय कांदे पाटील, दिपक कदम, आदीं पदाधिकाऱ्यानी गुलाबपुष्पे देवुन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट साहेब यांना सन्मानित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here