श्रीरामपूर : तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथे झालेल्या पेविंग ब्लॉकच्या कामांमध्ये अनियमितता असल्याची व सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार मनराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राहुल दातीर यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

मनसेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्‍यातील महांकाळ वडगाव ग्रामपंचायत परिसरात नऊ ते दहा महिन्यापूर्वी झालेल्या पेविंग ब्लॉकच्या कामाचे मोजमाप केले असता त्या कामांमध्ये इस्टिमेट मध्ये उल्लेख केलेल्या प्रमाणात कचकडीचा वापर करण्यात आलेला नाही तसेच पेविंग ब्लॉकदेखील हलक्या दर्जाचे वापरण्यात आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे. सध्या चालू असलेल्या मार्केट रेटनुसार दीड ते दोन लाखापर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु ग्रामसेवक, सरपंच, ठेकेदार यांनी संगनमत करून शासनाची दिशाभूल करून त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देऊन निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार करत असून मिटींगमध्ये महत्त्वाच्या कागदपत्रांवर महिला सरपंचाच्यावतीने त्यांचे पतीच सह्या करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिला सरपंचांच्या कार्यकाळातील झालेल्या ग्रामसभा व इतर महत्वाच्या मिटिंगमधील करून पेविंग ब्लॉकच्या कामाचे तीन लाखांच्या आसपास बिल दाखवून भ्रष्टाचार केला आहे असा आरोप निवेदनात करण्यातआलेला आहे.

शासकीय नियमाप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणाऱ्या कामाचा माहिती फलक लावणे बंधनकारक असताना मागील पाच वर्षात झालेल्या कोणत्याही कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले नाहीत. माहिती फलक न लावतात काम करणाऱ्या ठेकेदाराला सरपंचांनी विरोध का केला नाही याची चौकशी मागणी करण्यात आलेली आहे. सध्या ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच असल्याने प्रत्यक्षात मात्र त्यांचे पतीच ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरपंच पती मनमानी कारभार कागदपत्रावर महिला सरपंचाची आहे की त्यांच्या पतीची सही आहे याची चौकशी करण्याची मागणी करून सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार त्यांच्याविरुद्ध पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, डॉ. संजय नवथर, जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप, उपजिल्हाध्यक्ष सुभाष सोनवणे , तालुकाध्यक्ष सचिन पाळंदे, शहराध्यक्ष उदय उदावंत, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल दातीर, मनविसे तालुकाध्यक्ष विशाल शिरसाट, मनविसेशहराध्यक्ष विष्णू अमोलिक, तालुका प्रसिद्धीप्रमुख गोरक्षनाथ येळे, तालुका सरचिटणीस विकास शिंदे, मनविसे शहर संघटक अमोल साबणे, तालुका चिटणीस मारुती शिंदे, विभाग अध्यक्ष नंदू खेमनर, तालुकाध्यक्ष दादा कुसेकर, कार्तिक देवरे, विष्णू पवार, बाबासाहेब भालेराव आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here