श्रीरामपूर – श्री गुरुमाऊली सेवाभावी संस्था संचलित ” माऊली ” वृद्धाश्रमाचा तृतिय वर्धापन दिन व श्रीरामपूर – नेवासा रस्त्यावरील ओव्हर ब्रीज शेजारील दानशुर व्यक्तिमत्व श्री.राजेशशेठ कासलीवाल व शिरसगांवचे विद्यमान सरपंच श्री.आबासाहेब गवारे यांच्या सहकार्याने मिळालेल्या नवीन जागेचे भुमिपूजन गुरूवार दि २९/१०/२०२० रोजी अप्पर पोलिस अधिक्षक डॉ.दिपाली काळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली वृध्दाश्रमाचे अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी केले. डॉ.बाबुराव उपाध्ये, प्राचार्य टी.ई. शेळके व के.के.आव्हाड, लक्ष्मणराव निकम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नगर आकाशवाणीचे संतोष मते व डॉ.वृषाली राहुल वाघुंडे यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी केले.
कार्यक्रमास इंजिनिअर के.के.आव्हाड, बोरुडे सर, पोखरकर सर, डॉ.बाबुराव उपाध्ये, अनिरुद्ध महाले, कल्पेश चोथाणी, रामचंद्र राऊत, मेजर कृष्णा सरदार, जानराव, सेवानिवृत्त नायब तहसिलदार दाभाडे, राजेंद्र रासणे, प्रताप वढणे, अरुण विसपुते, सुहास शेरकर, मनोज जऱ्हाड, श्रीमती अलकाताई थोरात, सुरेखाताई थोरात, संदेश बाविस्कर, दिलीप गिरमे, सोमनाथ यादव, अण्णासाहेब अडांगळे, मुरलीधर विसपुते, दै. सार्वमतचे बद्रिनारायण वढणे, पत्रकार मनोज ज-हाड, पत्रकार प्रकाश कुलथे, श्रीरामपूर केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टचे अध्यक्ष उदय बधे, पंकज हिरण, डॉ.कमलजितकौर बतरा, डॉ. राजेंद्र लोंढे, डॉ.एस.एल. लबडे, सेवानिवृत्त समाजकल्याण आयुक्त प्रभाकर परदेशी, सुरेश गड्डे गुरुजी, बाळकृष्ण पाटणकर, राजेंद्र गवळी, देशपांडे, विजय काळे गुरु, गिरीश टंकसाळे, बबनराव तागड, शामराव पुरनाळे, कैलास खंदारे, योगेश क्षीरसागर, के.टी.जोशी, अक्षय दहिवाले, दिलीप भगत, बबन जाधव, रत्नाकर निकम, दत्तात्रय भांबारे, दिगंबर पवार, राजेंद्र जऱ्हाड, लुंकड बंधू, अगस्तिन गायकवाड, आदर्श जैन महिला मंडळ, सहयोग सामाजिक मंचच्या सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी डॉ.बाबुराव उपाध्ये, बुद्धिवंत सर, के.एल.खाडे, बाळासाहेब सरोदे , नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, नंदकिशोर वाघ सर यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली. कार्यक्रमाचे आभार प्रा.राजेंद्र थोरात यांनी मानले.