अहमदनगर/प्रतिनिधी :- महिला बचत गटाचे “मायक्रो फायनान्स ” सह इतर सर्व कंपन्यांचे कर्ज माफ होण्याकरिता सोमवारी नगर जिल्ह्यातील महिलांचा भव्य मोर्चा, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष डी एन साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार असून

महिला बचत गट व मायक्रो फायनान्सच्या सर्व कंपन्यांचे कर्ज माफ होण्याकरिता सोमवार दिनांक २ रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती ,आंबेडकर चौक ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी महिलांच्या वतीने
महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या माध्यमातून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष श्री दिलीप धोत्रे साहेब यांच्या नेतृत्वात, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे सरचिटणीस श्री. अनिल चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली , तसेच जिल्हाध्यक्ष श्री सचिन डफळ, श्री देविदास खेडकर, श्री दत्ता कोते ,श्री बाबा शिंदे , मनसे सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री नितिन म्हस्के ,महिला जिल्हा अध्यक्ष अनिताताई दिघे यांच्या उपस्थितीत हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चालाला जिल्ह्यातील इतर सर्व सेलच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे

यावेळी महिला बचत गट व मायक्रो फायनान्स सह इतर कंपन्यांचे कर्ज घेतलेल्या महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here