श्रीरामपूर (प्रतिनिधी)-संपूर्ण जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी टाकलेल्या एकलहरे गुटखा छापा प्रकरणात काल शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने काल उशिरा श्रीरामपूर एस टी डेपोच्या निवृत्त कर्मचारी अन्सार आजम शेख सह अरुण गांगुर्डे यांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली असून गुटखा व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगद असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पोलीस यंत्रणेने प्रथमतः 54 लाखांचा गुटखा साठा जप्त केला पुन्हा दोन दिवसानंतर याच भागातील एका बंद खोलीत गुटखा असल्याची माहिती तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. पोलीस पथकाने या बंद खोलीतुन 11 लाख 66 हजारांचा गुटखा सुगंधी तंबाखू पुन्हा जप्त केली.
परिसरात दोन वेगवेगळे छापे पडले पहिल्या ठिकाणी जो अवैध गुटखा सापडला त्या ठिकाणच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एका आठवड्यानंतर लागला तर दुसऱ्या छापा ठिकाणच्या मालकाचा शोध अर्धा महिना लोटूनही लागत नव्हता मात्र काल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख हाच गुटखा प्रकरणाचा स्थानिक गुटखा किंग असल्याचे समजले आहे ?
गुटखा छाप्याठिकानी गेल्या सहा महिन्यापासून गुटखा साठवून करून स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना दिला जात असे, सदर गुटखा कनेक्शन संगमनेर मधून असल्याचे समजले आहे, तो कोल्हार मार्गे याठिकाणी येत असे, ताब्यात घेतलेल्या अन्सार आजम शेख मुळे आता अस्सल आरोपी उजेळात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून ? एकलहरेचे अस्सल गुटखा किंग पर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना यश आले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अर्ध्या कोटींहून अधिक गुटखा जप्त झाला, त्या ठिकाणच्या मालक, चालकांपर्यन्त पोलीस प्रशासन पोहचलेले असल्याचे दिसून येत आहे.
या गुटख्याच्या अवैध व्यवसायात तीन प्रमुख भागीदार असल्याचे बोलले जात आहे, हे तिघे अनुक्रमे बेलापूर, एकलहरे व संगमनेरचे आहे. यापैकी संगमनेरचा जावई हा आपल्या बेलापूरच्या सासऱ्यासोबत संलग्न राहून एकलहरेतील तिसऱ्या भागिदारासोबत जावई कोल्हार मार्गे गुलाबाच्या बागेलगद असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये मध्यरात्री मोठमोठ्या ट्रकाभर गुटख्याच्या साठवनूक करीत असे व एकलहरेतील भागीदार आपल्या तीन भावांच्या मदतीने रातोरात श्रीरामपूर शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुटखा वितरणाचे काम करीत असे,
ज्या ठिकाणी गुटखा साठवून अवैध व्यवसाय चालू होता, त्याच्या लगद गुलाबाचा बाग असल्याने गाडीच्या आतील भागात गुटख्याच्या गोण्या व बाहेरील बाजूस गुलाबाचे फुले भरून वाहतूक होत असल्याचे परिसरात बोलले जात आहे.
तपासात पहिल्या छापा ठिकाणचा मालक अरुण गांगुर्डे याने गुटखा प्रकरणात अटक झालेल्या करीम आजम शेखला बॉण्ड वर आपली शेती कसण्यासाठी दिल्याचे प्रथमतः तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या तपासात उघड झाले होते. मात्र या तपासकामात बहिरट संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्याकडे गुटखा प्रकरणाचा तपास देण्यात आला. पुढे तपासात गांगुर्डे याने करीम आजम शेखला शेती कसण्यासाठी दिलेल्या बॉण्डवर खाडाखोड असल्याचे निदर्शनास आले असल्याने संजय सातव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत 54 लाखांचा गुटखा ठिकाणच्या मूळ मालकाचा कसून शोध घेत आहे.