शिरसगाव /वार्ताहर / :- अध्यात्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून ते समजून घेतल्यास माणूस सुखी होईल. अशा भक्तीची शक्ती वाढली की अधर्माचा नाश होतो असे विचार अडबंगनाथ धर्म संस्थानचे प्रमुख महंत अरुणनाथगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
येथील इंदिरानगरमधील माजी मुख्याध्यायपक भागवतराव मुठे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रवचनात महंत अरुणनाथगिरीजी महाराज बोलत होते. याप्रसंगी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, “राष्ट्र सह्याद्री “चे संपादक करण नवले, कार्यकारी संपादक सौ. पूनम नवले, भागवतराव मुठे पाटील, सौ.सुमनताई मुठे, अड. अरुणराव लबडे पाटील,सौ. उर्मिलाताई लबडे, सौ. कुसुमताई गवारे, आदिती भागवत, ह. भ. प. लक्ष्मणमहाराज, सुनंदाताई राऊत, श्री शरदराव मुठे पाटील, सौ. पल्लवी मुठे, सौ चंद्रकला भागवत, अक्षय भागवत, भारत मुठे पाटील, ओम मुठे पाटील उपस्थित होते.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी “फिरत्या चाकावरती “ह्या आत्मकथनाच्या पुस्तक भेटीने सर्वांचे स्वागत करून पुस्तकाचे विवेचन केले.महंत अरुणगिरीजी महाराज यांनी डॉ. उपाध्ये यांच्या निर्मितीला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला. करण नवले यांना महाराजांनी “अरुणोदय “हे आपले चरित्र भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. ते पुढे प्रवचनात म्हणाले, भारतीय संस्कृती अध्यात्मातून विज्ञान सांगणारी असून मनशांती त्यातून मिळते. जगात ज्याची गरज आहे तेच देण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. माणूस हा शाकाहारी प्राणी आहे, आहारशुद्धी असेल तर आरोग्य निर्माण होईल कोरोनासारखे व्हायरस नष्ट होतील. श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते. चांगल्या कर्म, विचारातून आपले राजहंसी स्थान निर्माण करा असा त्यांनी उपदेश केला. डॉ. उपाध्ये यांनी “दिवाळी आणि कोरोना “ही कविता सादर करून आपली दिवाळी सुखी होण्यासाठी आरोग्याची व इतरांच्या जगण्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. . करण नवले यांनी संस्कृतीमधील छोट्या छोट्या परंपरेतील विज्ञान माणसाला कळले तर अंधश्रद्धा संपेल. लिंबू, मिरची, बाहुली आजही बांधली जाते त्यामागील सूत्रविज्ञान त्यांनी समजून सांगितले. शेवटी. शरदराव मुठे पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here