श्रीरामपूर/प्रतिनिधी : श्रीरामपूर पोलिस स्टेशन मध्ये एकलहरे येथील नुरमहमद आजम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिळकनगर येथील स्थानिक वृत्तपत्राचे पत्रकार लालमोहमद जाफरमियाॅ जहागीरदार व मुलगा रिजवान लालमोहमद जहागीरदार यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २१६०/२०२०भा द वी ३४१,३८४असा खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने श्रीरामपूर सह उत्तर नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे

माहिती अशी की २५ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ९वाजेच्या सुमारास फिर्यादी व मित्र अर्जुन दादा मकासरे टिळकनगर येथे घरी जात असताना टिळकनगर येथे पत्रकार व त्यांच्या मुलाने अडवुण चौघा भावना गुटखा प्रकरणात अडकल्याशिवाय राहणार नाही मी पत्रकार आहे सर्वांना कामाला लावतो बातम्या चालुच ठेवतो जो पर्यंत दोन लाख रुपये देत नाही तोपर्यंत त्यावर रिजवान लालमोहमद जहागीरदार म्हणाला हे लोक तसे ऐकणार नाही पैसे देणार नाही तो पर्यंत बातम्या सुरु ठेवाव्या लागतील मी पैसे देणार नाही आमचा संबंध नाही असे म्हणताच माणसे गोळा करायला सुरुवात केली त्यानंतर ६/११/२०२०रोजी श्रीरामपूर येथील पेट्रोल पंपाजवळ पत्रकार व मुलगा भेटला पैसे दे नाहीतर ३२८च्या गुन्हा टाकुन गुंतुन टाकतो बातमी येईल तीन दिवसांची मुदत देतो नाहीतर गुटखा प्रकरणात अडकावतो अशी धमकी दिली तशी फिर्याद श्रीरामपूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल केल्याने पत्रकार व मुलगा या दोघांच्या विरोधात श्रीरामपूर पोलीसांनी प्रशिक्षणार्थी वरिष्ठ अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here