कोपरगाव/प्रतिनिधी (संजय भारती) केंद्रीय भूजल प्राधिकरण व हरिद लवाद व अन्न व औषधी प्रशासनाने आदेश जारी केल्या नंतर कोपरगाव नगरपालिकेने शहरात अवैध पाणी फिल्टर प्लांट हे सील करण्यातचे काम नगरपरिषदे मार्फत सुरु असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षात सर्वत्र विना परवाना हजारोच्या संखेत पाणी फिल्टर प्लांट सुरु करण्यात आले असून या प्लांट मध्ये नागरिकांना जार आणि बा प्रतिनिधी प्रतिनिधी टला मधून थंड पाण्याचा पुरवठा केला जात आहे.कोपरगाव शहरात व तालुक्यात देखील असे प्लांट सुरु झाले आहे.प्लांट सुरु करण्यासाठी केंद्रीय भूजल प्राधिकरण तसेच अन्न व औषधी प्रशासन आणि हरिद लवाद यांचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.मात्र अनेक प्लांटधारकांनी कोणतीही परवानगी अथवा ना हरकत दाखला न घेता प्लांट सूर केल्याचे एका पाहणीत समोर आल्याने या बेकायदेशीर प्लांटविरुद्ध राष्ट्रीय हरिद लवादाकडे याचिका दाखल झाली आहे.त्यामुळे पाणी पुरवठा करणारे पाणी फिल्टर प्लांट वादग्रस्थ ठरले आहे.न्यायालय आणि हरिद लवादाने ज्याच्याकडे शासनाची रीतसर परवानगी नाही असे सर्व प्लांट बंद करण्याचे आदेश दिले आहे.
कोपरगाव शहरात ३५ पाणी फिल्टर प्लांट हे अनधिकृत व बेकायदेशीर आढळून आल्यानंतर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने श्वेता शिंदे,ऋतुजा पाटील भाऊ वाईखिंडे,योगेश खैरे,रोहित सोनावणे सुनील अरण,राजेश गाडे,मार्गदर्शक उपमुख्याधीकारी सुनील गोर्डे या पथकाची नेमणूक केली असून या पथकांकडून विना परवाना धारकांवर पाणी फिल्टर प्लांट सील करण्यात आले आहे.
कोपरगाव शहरात एकूण १७० च्या आसपास पाणी फिल्टर प्लांट असून त्यात फक्त ३५ च प्लांट हे अवैध असल्याचे नगरपालिका प्रशासना कडून सांगण्यात आले आहे.बाकीच्या प्लांट धारकाची चौकशी करून पुढील काळात नगरपालिका त्याच्यावर कारवाई करतील कि नाही कि कागद पत्रीच सील करण्यात येईल या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here