कोपरगाव/प्रतिनिधी(संजय भारती) – ३ डिसेंबर हा दिवस सर्वत्र ‘जागतिक दिव्यांग दिन ‘म्हणून विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.
या पाश्र्वभुमीवर कोपरगाव येथील नगरपालिका शाळा क्र.६ येथे प्रेरणादायी गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे साहेब,न.पा.शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मोहनीश तुंबारे साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख व पांडूरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक अंतर ठेवून,नियमांचे पालन करुन अत्यंत आनंदी वातावरणात दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी डाॕ.हेलन केलर व लूईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समितीचे विषय साधनव्यक्ती,न.पा.शिक्षण मंडळ मुख्याध्यापक,शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग शिक्षकांचा सत्कार करण्यात करुन त्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
कोपरगाव तालुक्यातील विशेष गरजु विद्यार्थ्यांमधील सहा दृष्टिदोष असणारे विद्यार्थीना संगीताची आवड निर्माण होण्यासाठी लोकसहभागातून नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.यात न.पा.शाळा क्र.६ चे मुख्याध्यापक भरत आगळे,वैभव आगळे व सोमासे यांनी विद्यार्थ्यांना तबला,बासरी,ढोलकी व पेटी या वाद्यांचा परीचय करुन दिला.यावेळी आरती कोरडकर व सुनिता इंगळे यांनी आगळे सरांच्या वाद्य टिमबरोबर स्वागतगीत गाऊन उपस्थितांचे स्वागत केले.
यानंतर दिव्यांगांच्या कार्यक्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती सांगणारे पालक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे न.पा.शाळा क्र.६ च्या उपक्रमशील शिक्षिका सुनिता इंगळे यांच्या संकल्पनेतून व सुवर्णा मगर मॕडम यांच्या प्रेरणेतून नाविण्यपूर्ण कला दालनाचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची माहिती देणारी पोस्टर ,ब्रेल लिपीचे पुस्तक ,मोठी पुस्तके ही उपलब्ध करुन देण्यात आली होती.अशा या आगळ्यावेगळ्या कला दालनाचे सर्वांनी कौतुक केले.
समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत श्रीमती मगर सुवर्णा, विशेष तज्ञ, श्रीमती काळे लता विशेष तज्ञ, विशेष शिक्षक श्री गुरसळ कांतीलाल,
श्री म्हस्के सचिन श्री.रणधिर अमित,श्री पाखरे राजेंद्र ,विषय तज्ञ संजय दहिफळे, न.पा.शाळा क्र.६ येथील मुख्याध्यापक भरत आगळे ,अरुण पगारे ,सुनिता इंगळे ,सविता साळुंके ,कल्पना निंबाळकर ,आरती कोरडकर ,उर्दू शाळेचे मुख्याध्यापिका शबाना शेख व सहकारी ,न.पा.शाळा क्र एक व तीन चे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here