कोपरगाव/प्रतिनिधी (संजय भारती) – निवडणुका जवळ आल्या की,सर्वानाच महापुरूषांची आठवण. येते. महापुरूषांनी आपले जीवन समाजासाठी देशासाठी अर्पण केले.आज त्याच महापुरूषांच्या पुतळ्यांना अंधारतच राहावे लागतआहे. कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यालगत व मध्यवर्ती भागात असणारा भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अंधारात असल्याचे भिम सैनिकांच्या निर्देशनास आले असुन या ठिकाणी कायमस्वरूपी उजेडाची सोय करावी या मागणीचे निवेदन कोपरगावचे सामाजिक कार्यकर्त नानासाहेब मोरे यांनी कोपरगाव नगर परीषदेला दिले आहे

देशाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देवून देशाचा अंधार दुर केला.आज त्याच महापुरूषांच्या पुतळ्या अंधारात आहे.हि खुप मोठी शोकांतिका असल्याचे कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब मोरे यांनी या निवेदनात म्हटले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असुन येथे मूर्तीवर अंधार असतो.त्यामुळे मूर्ती दिसत नाही. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे कोपरगावची शान आहे.या स्मारकातील. मूर्ती अंधारत असते.हि बाब लाजिरवाणी असुन येथे कायमस्वरूपी उजेड करन्यात यावा अन्यथा तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहरातील भिमसैनिकांनी दिला आहे

या निवेदनावर नानासाहेब अर्जुनराव मोरे,प्रकाश जयराम खरात,विलास अहिरे जिल्हा अध्यक्ष लो.ज.पा.,लक्ष्मण शिंदे,एस,एस पवार,अशोक गुजांळ,सुजल चंदनशिव शहराध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन,शंकर बिर्हाडे,बाबासाहेब जमधडे,नितिन शिंदे,साहेबराव शिंदे,मनोज शिंदे,मनोज शिंदे,राजेंद्र घोडेराव,मुकेश गुप्ता, दत्तु पगारे यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here