श्रीरामपूर – दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणेसाठी व शेतकरी विरोधी तीनही कृषि कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंद मध्ये श्रीरामपूर शहर व तालुकावासीयांनी उत्सुर्फपणे सहभागी होण्याचे आवाहन विविध राजकीय पक्ष, संघटनांनी केले आहे.
यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले की, शेतकरी संघटनांशी चर्चेशिवाय घाईघाईने कृषी संबंधित अध्यादेश केंद्र सरकारने काढले. त्यानंतर त्यांचे कायद्यात रूपांतर करतानाही संसदेत चर्चा करण्यात आली नाही. कोणत्याही शेतकरी संघटनेने मागणी केली नसताना शेतकरी हिताच्या नावाखाली हे कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. हे लोकशाही प्रक्रियेला धरून नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवावा, अशी त्यांची आजवरची वाटचाल नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत त्यांनी घूमजाव केले आहे. तोंडी आश्वासनाऐवजी शेतकऱ्यांना आधारभूत किमतीचा कायदा हवा आहे.तसेच आंदोलनातून मार्ग काढण्याऐवजी केंद्र सरकार दडपशाही करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या विरोधात सर्व शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंद मध्ये श्रीरामपूर तालुका व शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन आ आमदार लहू कानडे,उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर,नागेशभाई सावंत, लकी सेठी, कॉ.जीवन सुरूडे, तिलक डुंगरवाल, सचिन बडदे , योगेश बोरुडे, विकास डेंगळे ,ऍड.समिन बागवान,अहमदभाई जहागीरदार,कैलास बोर्डे,फिरोज शेख, जोएफ जमादार, सह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, लाल निशाण पक्ष, शेतकरी संघटना, व विविध संघटनेने आदींनी केले आहे.