कोपरगाव/प्रतिनिधी (संजय भारती) :- भारत हा कॄषीप्रधान देश जगाला अन्न धान्य पुरविण्यातअग्रेसर आहे .कित्येक वर्षा पासुन शेतकरी राजा आपला घाम गाळुन जगाला दोन वेळच पोटभर अन्न पुरवत आलेला आहे.अशा देशात शेतकरी हिता विरोधी कायदे बनवले जात असतील तर शेतकरी हि खेदाची बाब असल्याचे सांगत केंद्र सरकारने अश्या प्रकारचे कायदे त्वरीत रद्द करावे अशी मागणी जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल चे सचिव व प्रगतशील शेतकरी सुनिल भास्करराव होन यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात केली आहे .
देशातील सर्वच शेतकऱ्यांची अवस्था सारखीच असुन शेतकरी नेहमी अस्मानि व सुल्तानि अशा दोन्ही संकटांना मोठ्या धैर्याने व तेवढ्याच ताकतीने तोंड देत आहे.परंतु केंद्र सरकार शेतकरी हिता विरोधी कायदे करुन शेतकऱ्याला वेठीस धरू पहात असले तर शेतकरी त्यांना कधीही माफ करणार नाही सरकार ने लक्षात घ्यावे. निर्सगाचा लहरीपणा तसेच शेतीमालाला शाश्वत बाजारभाव नसल्याने आज महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपुर्ण देशातला शेतकरी मेटाकुटीला असला तरी तो कधी रस्त्यावर येत नाही.कामात राम माननारा हा वर्ग आहे. परंतु आर्थिक संकटात सापडलेल्या जगाच्या पोशिंदयावर रस्त्यावर येन्याची वेळ येत असेल तर सरकारने हे जाणून घेतले पाहीजे की कोरोना च्या लाॅकडाऊन काळात सगळे उद्योग ठप्प होते तेव्हा जनतेला अन्न धान्य ची कमतरता पडली नाही कारण जगाचा पोशिंदा त्यावेळी आपल्या शेतात राबत होता.तो कधीच नोकरदारांच्या विरोधात आंदोलन करत नाही, फक्त त्याच्या वर होणाऱ्या अन्याय विरोधात आंदोलन करतो तेव्हा केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहु नये अन्यथा हे आंदोलन रौद्र रूप धारण करू शकते, तेव्हा त्वरीत शेतकरी हिताविरोधी कायदे रद्द करावे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सुनिल होन आहे यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here