कोपरगाव/प्रतिनिधी (संजय भारती) :- कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे दि.९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने एक गाव एक दिवस अभियान राबविन्यात येत असुन या अंर्तगत विजग्राहकांच्या अडचणी व तक्रारीचे निवारण कंपनीचे आधिका-यांनी प्रत्यक्ष गावात येउन केल्याची माहीती सरपंच नानासाहेब चौधरी यांनी दिली मागील काही वर्षापासून वीज वितरण कंपनीबाबत वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी होत्या. आमदार मा.श्री.आशुतोषदादा काळे यांनी उर्जामंत्री मा.ना.श्री. नितीनजी राऊत साहेब व उर्जा राज्यमंत्री मा. ना. श्री. प्राजक्तदादा तनपुरे यांची भेट घेवून त्यांचे शेतकऱ्यांच्या व वीज ग्राहकांच्या अडचणीकडे लक्ष वेधले होते. तसेच आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून बहुतांश वीज ग्राहकांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत.उर्जा खात्याने सुरु केलेल्या या उपक्रमाद्वारे ज्या वीजग्राहकांच्या काही अडचणी किंवा तक्रारी असतील त्या तक्रारींचे प्रत्यक्ष गावात जाऊन निवारण केले जाणार आहे.
सदर अभियान साठी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन श्रीसुधाकर रोहोम जि प सदस्य श्री कारभारी (नाना) आगवन प.स. उप सभापती श्री अर्जुन दादा काळे प स सदस्य श्री श्रवण असने सरपंच श्री नानासाहेब शशिकांत चौधरी ग्रा प सदस्य श्री जगन ननावरे श्री प्रशांत रणशूर श्री बाळासाहेब रणशूर श्री शिवाजी दगु चौधरी श्री थोरात सर श्री रावसाहेब चौधरी श्री रामदास रणशूर श्री सोपानराव व हाडणे श्री निळकंठ रणशूर श्री निखिल जाधव ग्रामसेवक सौ.अहिरे महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री सांगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता श्री गोसावी साहेब यांचे मार्गदर्शन व उपकार्यकारी अभियंता श्री चावडा साहेब कनिष्ठ अभियंता श्री सावडेकर साहेब तंत्रज्ञ श्री झावरे तसेच कोपरगाव विभागातील सर्व सहाय्यक अभियंते, तंत्रज्ञ, लाईनमन, फोरमन, बिलिंग विभागाचे सर्व अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित राहुन आपल्या वीज वितरण कंपनी कडुन ग्राहकांच्या अडचणी सोडवून घेतल्या उपस्थित सर्व अधिकारी व सभापती, उपसभापती, व्हाईस चेअरमन ,सदस्य सर्वांचे छोटेखानी सत्कार करण्यात आला व ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे वतीने सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here