कोपरगाव/प्रतिनिधी (संजय भारती) :- मागील पाच वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायततीच्या समन्वयातून प्रत्येक गावाचा विकास साधला गेला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातुनच मार्गी लागत असतात.त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून ग्रामपंचायत हि विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील तिळवणी ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर लोकार्पण व जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला व त्या माध्यमातून तीळवणी मध्ये १ कोटी ४ लाख रुपयांचे विकासकामे झाली आहेत. तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून भरीव निधी मिळाल्यामुळेच ग्रामीण भागातील विकासाचे बहुतांश प्रश्न सुटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवन, सांडूभाई पठाण, राहुल जगधने, चांगदेव गायके, ज्ञानेश्वर पगारे, अशोक वाघ, राजाराम पाटील, सोमनाथ शिंदे, गजानन शिंदे, विश्वनाथ गायके, दत्तात्रय शिंदे, पोपटराव शिंदे, रामभाऊ खिलारी, वाल्मिक निकम, नानासाहेब निकम, पोपटराव भुजाडे, प्रकाश शिंदे, नंदू रांधवणे, अशोक उकिरडे, इरफान पटेल, पंचायत समिती उपअभियंता उत्तम पवार, शाखा अभियंता राजेंद्र दिघे, लाटे, विस्तार अधिकारी व प्रशासक वाघमोडे, ग्रामसेवक योगेश देशमुख, ठेकेदार विशाल पावले, निखिल गुजराती, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here