संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दि.११ डिसेंम्बर रोजी संगमनेर येथे उत्तर अ.नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली,यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे,आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,इंद्रजीतभाऊ थोरात, बाबा ओहोळ,काँग्रेस कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे,समन्वयक किरण काळे,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे,उपाध्यक्ष तुषार पोटे,निखिल पापडेजा,कार्याध्यक्ष सुभाष सांगळे आदींसह विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.कोपरगाव तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा आढावा युवक जिल्हा उपाध्यक्ष तुषारजी पोटे यांनी मांडला,प्रसंगी कोपरगाव शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील साळुंके,कार्याध्यक्ष मंगेश देशमुख,तालुका सरचिटणीस विष्णू पाडेकर,ज्ञानेश्वर भगत,शब्बीरभाई शेख,महिला तालुकाध्यक्षा ऍड.शीतल देशमुख,महिला शहराध्यक्षा रेखाताई जगताप,तालुका सरचिटणीस सविता विधाते,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीजय चांदगुडे,कार्याध्यक्ष सागर बारहाते,युवक शहराध्यक्ष अक्षय आंग्रे,मागासवर्गीय सेल चे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल,शहराध्यक्ष रवींद्र साबळे सर,सचिव यादवराव त्रिभुवन,विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सचिव निरंजन कुडेकर,विद्यार्थी शहराध्यक्ष आशपाक सय्यद,सोशल मीडिया प्रमुख दादा आवारे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.