कोपरगाव(प्रतिनधी): कोपरगाव शहरात लोखंडी सुऱ्याचा धाक दाखून चार अज्ञात चोरट्यांनी जवळपास पाच लाख किंमतीची चोरी केल्याची घटना काल दि.११ डिसेंबर रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत असे कि फिर्यादी दिलीप शंकर गौड (वय ३५) धंदा व्यापार रा.निवारा हे आपले वाईन शॉपचे दुकान दि.११ डिसेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास बंद करून दिवसभारातील दुकानातील जमा रक्कम एका बॅग मध्ये घेऊन स्कुटी गाडीवर एका मजुरा समवेत घरी जात असताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात ,भाई भाई मोटार गँरेंजसमोर पाठीमागून विनानंबरच्या दोन मोटारसायकल आल्या त्यापैकी एक शाईन आणि एक पल्सर मोटारसायकल होती.या दोन दुचाकीवर स्वार चार अज्ञात चोरट्यांनी यातील फिर्यादीचे मोटारसायकलवरील बॅगेतील ४,९८,९००/-रु.रोख रक्कम , एक टॅब,सॅमसंग कंपनीचे २ अँड्रॉईड फोन व तसेच कागदपत्रे असलेली बॅग असा ऐवज त्यांच्या समतीशिवाय लोखंडी सुऱ्याचा धाक दाखून लबाडीच्या इराद्याने बळजबरी चोरून नेली असल्याची फिर्याद दिलीप शंकर गौड यांनी दिली असून यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला चार अज्ञात आरोपीविरुद्ध गु.रजि.न.कलम ८३८/२०२० भादवी कलम ३९७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.स.ई.भरत नागरे हे करत आहे.
शहरात दिवसेन दिवस गुन्हेगारी वाढत असून पोलीस यंत्रणा या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणते पाउल उचलेल या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here