संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
कोरोना माहामारीपासुन ते आजपर्यंत पत्रकार फ्रंटलाईन वर्कर म्हणून आजही काम करत आहे. लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात पत्रकारांचा देखील समावेश करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनानुसार केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार त्याचसंदर्भातील मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचा प्रसार कमी होत चालला असताना राज्यात लसीकरणाची तयारी सुरु आहे. राज्यात लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्यांचं टास्क फोर्सचं गठन करण्यात आली आहे. तसेच, राज्य पातळीवर लसीकरण मोहिमेसाठी कंट्रोल रुमही तयार करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर अतिरिक्त आयुक्तांच्या अंतर्गत शहरांमधील टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलीय. स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत वॉर्ड टास्क फोर्सची निर्मिती करण्यात निती आयोगाअंतर्गत कोविड-19 लसीकरणासाठी प्रशासनातील राष्ट्रीय तज्ञ गटही केंद्र स्तरावरील समिती देशभरातील लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवणार आहे. लसीकरणाबाबतच्या महत्वाच्या निर्णयाचे आणि पॉलिसी ठरवण्याचे अधिकार या केंद्रीय स्तरावरील समितीला देण्यात आल्याची माहिती आम्हाला उपलब्ध झाली आहे. आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्या जोडीने पत्रकारांनी देखील जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीत पत्रकारांनी रात्रदिवस काम केलेले आहे. जवाबदारी घेवुन काम करत असतांना काही पत्रकारांना जीव देखील गमवावा लागला आहे. तर काही पत्रकार आजही कोरोना बाधित आहेत. पत्रकार देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून आजही काम करत आहे. लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात पत्रकारांचा समावेश करणे देखील गरजेचे आहेत यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे शेवटी सौ. कोल्हे म्हणाले. दिलेल्या निवदेनप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगांव तालुकाध्यक्ष मनिष जाधव, जनार्दन जगताप, विनोद जवरे, हाफीज शेख, स्वप्नील कोपरे, विजय कापसे, राजेंद्र जाधव, अक्षय काळे, शिवाजी जाधव, लक्ष्मण जावळे, फकिरा टेके, रविंद्र जगताप, योगेश गायके, अमोल गायकवाड, संदीप विदुर, सुमित थोरात, गणेश कांबळे, गहिनाथ घुले, समाधान भुजाडे, रविंद्र साबळे, मधुकर वक्ते, योगश रुईकर, अनिल दिक्षीत, सोमनाथ  डफळ यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here