संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -मा.केंद्रीय मंत्री श्री.जयसिंगराव गायकवाड यांनी आज कोपरगाव नगरपरिषद येथे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची सदिच्छा भेट घेतली
यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.स्व.सूर्यभानजी वहाडणे यांच्या सहवासातील अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.स्व.वसंतरावजी भागवत,स्व.उत्तमराव नाना पाटील यांच्या काळात पक्षात नेते व कार्यकर्त्यांत कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.आज दुर्दैवाने तसे वातावरण राहिलेले नाही.पक्षसंघटनेतील जेष्ठ व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उपेक्षा पक्षासाठी घातक आहे याचे भान असायला हवे असे यावेळी बोलतांना श्री.जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक संजय कांबळे,शिवराज वहाडणे,श्री.धुमाळ हेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here