संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावात लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली परजने गटाच्या स्वाती गजानन रणधीर यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
माजी उपसरपंच सौ.अनुसया मनाजी होन यांनी राजीनामा दिल्या नंतर रोटेशन पद्धतीने स्वाती रणधीर यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. गावातील त्यांच्या वार्डमध्ये त्यांनी सातत्याने
विकासाची चांगली कामे केली असुन त्या कामाची पावती म्हणुन त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली .
या वेळी डाऊच गावातील लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ ,दिगंबर पवार,मुन्ना सयद्,सलीम भाई पटेल ,शेपीलालभाई ,बाळासाहेब गुरसळ, बापुसाहेब गुरसळ, अनील रणधीर बाजीराव गुरसळ, देवीदास पवार,आदी उपस्थित होते
त्याच्या या निवडीबद्दल डाउच पंचक्रोशीतुन त्यांचे अभिनंदन होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here