संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव -शहरातील बैल बाजार रस्ता हा निवारा सुभद्रानगर खडकी ओमनगर व इतर उपनगरांना जोडणारा महत्वाचा रस्ता असुन फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या रस्त्याचे काम सुरू परंतु कोरोनाच्या महामारी व पावसाळा यामुळे हे रखडले आहे. सध्या कोरोना नियंत्रणात असुन आता पावसाळाही संपला आहे.त्यामुळे त्वरित रस्त्याचे काम सुरु करावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी नुकतेच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे.
यावेळी सुरेश मरसाळे,फिरोज पठाण,तौफिक कुरेशी,अस्लम शेख,अजहर शेख,आजीम शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here