रांजणखोल-(भाऊसाहेब जाधव) सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच बैठं काम आणि जंकफूड, पिझ्झा, बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड. अशात विविध जंतू, विषाणूंचा संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे आपल्या आरोग्यासह कुटुंबसौख्यासाठी कोणते बदल स्वीकारायला हवेत, हे समजून सांगण्याचे काम समाजातील विविध क्षेत्रांतील जाणत्या लोकांना, तज्ज्ञांना करावे लागणार आहे. त्यादृष्टीने वेलनेस सेंटर ”तर्फे रविवार दि.२० रोजी दुपारी १२ वाजता राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे ग्रामपंचायती समोर ‘आरोग्य धनसंपदा-महाराष्ट्र’ मिशन २०२०-२१ या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर ‘आरोग्य तुमचे आणि कुटुंबाचे’,व्यायाम व आहार वजन कमी करा व वाढवायचे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सपना वेलनेस सेंटरचे सर्वसर्वा अर्जुन सुसे व सपना सुसे वेबिनारचे प्रस्तुतकर्ते आहेत या आरोग्य विषयक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन रतीका ङांगे,पत्रकार भाऊसाहेब जाधव,सचिन मुसमाङे आदिंनी केले आहे