संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतिबंध लागू करण्याबाबतचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे शाळांमध्ये शिपाई पद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा कोपरगाव तालुका शिक्षकेतर संघटनेने दिला
कोपरगाव तालुका माध्यमिक शिकक्षेतर संघाच्या वतीने शासनाच्या निर्णयाच्या आदेशाचा निषेध करून मा तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले .
या वेळी 11 डिसेंबर 2020 चा आदेशाची होळी करण्यात आली या वेळी शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री वाल्मिक काकडे तालुका मुख्याध्यापक संघ सचिव श्री शिवाजी लावरे शिक्षकेतर संघटनेचे सचिव दत्तात्रय बर्गे उपाध्यक्ष शैलेश गाडेकर. गणेश गोसावी. विष्णुपंत ढोले. बाळू विखे. नितीन जाधव. कैलास सातपुते. मारुती काटे. जितेंद्र बोरा. कमलेश गायकवाड मेहरखांब. गागरे. रमेश लोखंडे. दिवे. शशिकांत जैन. साईनाथ नाईक. राजू उनवणे विठ्ठल मोरे नेताजी नाईक इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here