संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कुंभारी येथील सार्वजनिक वाचनालयात श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष रमन गायकवाड यांच्या हस्ते श्री संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण गायकवाड, यशवंत गायकवाड विठ्ठल घुले,सचिन कोकाटे सुनिल गायकवाड बबन भारती, शकुर मनियार,भाऊ पवार,आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमन गायकवाड म्हणाले श्री संत गाडगेबाबांनी आपले संपुर्ण आयुष्य समाजसेवेसाठी झिजवले आहे. दुःखी कष्टी आजारी माणसांची सेवा करून देव नेमका कशात आहे हे समाजाला आपल्या कृतीतुन दाखवुन दिले. समाजाचा अध्यात्मिक विकास होण्यासाठी तळमळीने कार्य करणारे थोर संत होते.अज्ञान अस्वच्छता अंधश्रध्दा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेउन किर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारण्याचे कार्य करणारे एक थोर समाज सुधारक होते. गाडगेबाबांनी स्व:ताच्या हातात झाडु घेउन जनमानसाला स्वच्छतेचे मंत्र देऊन माणसाचे ऐहीक जिवन सुखी होउन तो अंधश्रध्देपासुन मुक्त व सुशीक्षीत संपन्न कसा होईल यासाठी सदैव प्रबोधन केले असे सांगत त्यांनी वऱ्हाडच्या मातीतील या संताला मनोभावे वंदन केले. शेवटी सचिन कोकाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here