श्रीरामपुर/प्रतिनिधी :- पंतप्रधान आवास योजना अंतर्गत गोरगरीब व गरजू लोकांचे घराचे स्वप्न साकार करणेसाठी केंद्र सरकारच्या योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे तिसरे व चौथे हफ्तेची राहिलेली रक्कम त्वरित देण्यात यावी. यासाठी श्रीरामपूर नगर परिषद नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांना मनसे च्या वतीने निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ म्हणाले की , पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गोरगरीब लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार या आशेने अनेकाने आपले पत्र्याचे घर पाडून नव्याने स्लॅबचे पक्के बांधकाम करणेसाठी काम चालू केले. यामुळे अनेक जण दुसरीकडे भाडे तत्वावर राहत आहेत पण सध्या कोरोनाच्या महामारी मुळे लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची दोन वेळची खाण्याची पंचायत झालीली आहे आशा परीस्थितीत घर भाडे भरण्याची त्यांची परिस्थीत राहिलेली नाही. त्यामुळे अनेकांने खाजगी पतसंस्था,मायक्रो फायनान्स, व नातेवाईकांनाकडून उसने पैसे घेतलेले आहे. या सर्वांची देने दारी झाल्याने अनेकांना मानसिक त्रास होत आहे. यामध्ये नागरिक आपला संसार कसाबसा चालवत आहे

नगरपालिका नगराध्यक्ष अनुराधा ताई आदिक यांच्या समोर लाभार्थ्याच्या समस्या मांडताना मनसे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे

केंद्र सरकार व श्रीरामपूर नगरपरिषद यांनी गरिबांची राहीलेली रक्कमेचा तिसरा व चौथा हप्ता देत नसल्याने गोरगरिबांची जाणून बुजून पिळवणूक होत असल्याचे जाणवत आहे. या गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी सहा ते सात दिवसानंतर श्रीरामपुर नगरपरिषद समोर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात येईल त्या प्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास आपण स्व;हता व आपले नगरपरिषद अधििकारी जबाबदार राहतील असे मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विशाल शिरसाठ म्हणाले त्या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे , जिल्हा सचिव तुषार बोबडे, नगरसेवक रवी पाटील शहराध्यक्ष. सचिन पाळंदे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष योगेश जाधव. विध्यार्थी सेना उपजिल्हाद्यक्ष उदय उदावंत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ,तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ येळे, उपशहराध्यक्ष बाबासाहेब भालेराव,मनविसे शहरसंघटक विकास शिंदे, मनवीसे सरचिटणीस संकेत शेलार ,मनविसे उपशहराध्यक्ष रतन वर्मा,प्रमोद शिंदे,नंदकुमार खेमनर,विकी शिंदे,आर्यन शिंदे, मारुती शिंदे , सागर त्रिभुवन, राजू शिंदे,नानेश्वर काळे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठे संख्यने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here