राहता/प्रतिनिधी :- गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश  आले मोबाईल चोरांला राहता  पसिरात सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून मोबाईल या गुन्ह्यात हस्तगत करण्यात आला

श्रीरामपूर तालुक्‍यातील रेणुकानगर येथील फिर्यादी स्वप्निल नंदकिशोर सोनार यांच्या शर्टचे खिशातून १८ हजार रुपये
किंमतीचा सॅमसंग कंपनीचा A ५१ मॉडेलचा फोन एका इसमांनी बळजबरीने हिसकावून नेला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून राहता शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी वरुन गु.र.नं. ६९२/२०२० भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्या नंतर पोनि श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे व त्यांचे पथकाती अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने समांतर तपास करीत असतांना, पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा मोबिन शेख, असल्याची खात्रिशिर माहिती मिळाल्याने पथकातील पोना/विशाल दळवी, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/रविंद्र रोहिदास नवगिरे हे राहाता येथे जावुन आरोपींचे वास्तव्या बाबत माहिती काढुन आरोपी नामे मोबिन फारुख शेख, वय २८, रा. राहाता, जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा असल्याची देवुन गुन्हयातील १८०००/- रु. किंमतीचा सॅमसंग a ५१ मॉडेलचा मोबाईल काढुन दिल्याने तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह राहाता पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आहे. तपास राहाता पोलीस स्टेशन चे पोलीस सहायक फौजदार रावसाहेब शिंदे करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. दिपाली काळे मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मा. श्री. संजय सातव, उपविभागीय पोलीस अधीकारी शिर्डी विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व राहता पोलीस ठाण्याचे पो.नि.सुभाष भोई यांच्यासह पोलीस सहायक फौजदार रावसाहेब शिंदे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here