पैठण/प्रतिनिधी :- लोकशहिचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारीतेचा आजच्या परिस्थितीमध्ये गैरवापर करताना काही पत्रकार दिसत आहे. जनतेचा आवाज उठवण्यात करिता जी पत्रकारिता कामी यायची तीच पत्रकारिता आज स्वतःची दुकानदारी करताना पैठण शहरात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. पैठण शहरातील भवानीनगर मधिल एका पत्रकाराने आपल्या पत्रकारितेचं शस्त्र करून प्रशासनाला ब्लॅकमेल करून पत्रकारीतेचा धाक दाखवून व नगरपरिषदेची निगडित असलेले आपले नातेवाईक यांना हाताशी धरून शहरातील अनेक भूखंड बळकावले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी दुकाना थाटून बसले आहे व काही दुकाना तर भाडे तत्वावर दिलेल्या आहे , ज्याचे भाडे 20 ते 50 हजार रुपये पर्यंत आजच्या परिस्थितीमध्ये मिळत आहे.

या पत्रकारांवर या अगोदर पैठण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे. पेपरला कुठल्याही प्रकारची अधिकृत नोंद नसून निव्वळ व्हाट्सअप फेसबुक वर आपल्या पेपरचे हेडींग वार नाव टाकून खाली ढोबळ स्वरुपाची बातमी लावून प्रशासनावर दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतात व आपला हेतू साध्य करून पैसे घेऊन भूखंड लाटून गप्प बसतात व पुन्हा पुढचे डिपारमेंट ब्लॅकमेल करायला डोळ्यासमोर ठेवतात व आपले हेतू साध्य करून घेतात. या सर्व बाबीकडे नगरपरिषद प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय हे लक्ष देणार का याची वाट आता जनता बघत आहे. नगर परिषदेचा अतिक्रमण विभाग यावर कारवाई करेल का व पैठण पोलीस स्टेशन अशा बोगस पत्रकारांवर गुन्हे दाखल करणार का असा सवाल आता सर्वसामान्य लोकांमधून होत आहे.

पैठण नगर परिषद हद्दीमध्ये काही पत्रकारांचा निव्वळ पत्रकारितेचा धाक दाखवून ब्लॅकमेलिंग करून पैसे लाटण्याचा निव्वळ धंदा मांडला आहे. शहरातील अनेक भूखंड अनेक जागा त्यांनी बळकावल्या आहे व याबाबत मी नगरपरिषद अनेक वेळेस तक्रार दिलेली आहे. जर हे अतिक्रमण येणाऱ्या आठ दिवसात काढले नाही तर मी नगर परिषद कार्यालय औरंगाबाद येथे उपोषणाला बसणार आहे व आशा पत्रकारांवर या अगोदर जे गुन्हे दाखल झाले आहे या गुन्ह्यामध्ये मी स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत विशेष लक्ष घालणार आहे. :- रघुनाथ ब. ईच्छय्या सामाजिक कार्यकर्ता, पैठण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here