पैठण/प्रतिनिधी :- लोकशहिचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारीतेचा आजच्या परिस्थितीमध्ये गैरवापर करताना काही पत्रकार दिसत आहे. जनतेचा आवाज उठवण्यात करिता जी पत्रकारिता कामी यायची तीच पत्रकारिता आज स्वतःची दुकानदारी करताना पैठण शहरात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. पैठण शहरातील भवानीनगर मधिल एका पत्रकाराने आपल्या पत्रकारितेचं शस्त्र करून प्रशासनाला ब्लॅकमेल करून पत्रकारीतेचा धाक दाखवून व नगरपरिषदेची निगडित असलेले आपले नातेवाईक यांना हाताशी धरून शहरातील अनेक भूखंड बळकावले होते. विशेष म्हणजे काही ठिकाणी दुकाना थाटून बसले आहे व काही दुकाना तर भाडे तत्वावर दिलेल्या आहे , ज्याचे भाडे २० ते ५० हजार रुपये पर्यंत आजच्या परिस्थितीमध्ये मिळत आहे.
या पत्रकारांवर या अगोदर पैठण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे. पेपरला कुठल्याही प्रकारची अधिकृत नोंद नसून निव्वळ व्हाट्सअप फेसबुक वर आपल्या पेपरचे हेडींग वार नाव टाकून खाली ढोबळ स्वरुपाची बातमी लावून प्रशासनावर दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतात व आपला हेतू साध्य करून पैसे घेऊन भूखंड लाटून गप्प बसतात व पुन्हा प्रशकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायलच डोळ्यासमोर ठेवतात व आपले हेतू साध्य करून घेतात. या सर्व बाबीकडे नगरपरिषद प्रशासन यांनी जातीने लक्ष देऊन परिषदेच्या अतिक्रमण विभाग यांनी कारवाई केली असुन अखेर त्या तोतया पत्रकाराने केलेले ते बोगस आतिक्रमन ला नगर परिषद प्रशासनाने ठोकले टाळे अतिक्रमण लवकरच जमिनोद्धवस्त करून परदेशीपुरा कडे जाणारे वाहतूक लवकरच मोकळी करणार असे नगरपरिषद अतिक्रमण विभागाच्या मार्फत बोलले जात आहे याबाबत नागरिकांना मध्ये नगरपालिका बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे

स्वराज्य समाचार इफेक्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here