अकोले/प्रतिनिधी :- सोने चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील गुन्हेगारांच्या सराईत टोळीस राजूर पोलिसानी  जेरबंद करण्यात यश आले

यांची सविस्तर माहिती अशी की अकोले तालुक्‍यातील राजूर येथे बस स्टॅण्ड परिसरात सोने चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील गुन्हेगारांच्या सराईत टोळीस राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून हजारो रुपयांचा नेकलेस हार हस्तगत केला आहे. यात साहिल नाशिक खान (रा. श्रीरामपूर) अर्जन कानिफनाथ भोसले (रा. अहिल्यादेवी नगर
श्रीरामपूर), कमलेश उत्तम पवार (राहणार अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर), गुफरान निसार पठाण (राहणार सोमेश्वर पथ श्रीरामपूर) या चौघांना राजूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता यापुर्वीही त्यांनी राजूर परिसरात असे गुन्हे केल्याची कबुली दिली
आहे. आता आरोपींना मुद्देमालासह राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्या विरोधात गु .र.नं २९८/२०२० भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा नोंदला असुन  पुढील तपास राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितिन खेरनार सह पो हे कॉ आलाव पो कॉ गाडे पो कॉ फटागरे  पो कॉ काळे हे करत आहे. या कामगिरीनंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी राजूर पोलिसांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here