श्रीरामपुर/प्रतिनिधी :- दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन व रिपाइंचे तालुकाध्यक्ष तथा दत्तनगर चे लोकनियुक्त सरपंच सुनील शिरसाठ यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांचे स्वागत करून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्यास संदर्भात होत असलेल्या दिरंगाईबाबत सखोल माहिती दिली असता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना फोन लावण्यास सांगितले

त्यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यास लवकरात लवकर परवानगी द्यावी असा आदेश देऊन श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक तसेच पुतळा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन सरपंच सुनील शिरसाठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे पदाधिकारी यांना जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यास सांगितले यावेळी संजय रूपटक्के, रॉकी लोंढे, राजेंद्र मगर, संजय बोरगे, प्रदीप कदम, प्रदीप गायकवाड, अरुण वाघमारे, संदीप धीवर, अर्जुन शेजवळ आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here