आणखी मदतीची गरज दानशुरानी पुढे यावे…..

राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी :- येथील तरुण संदेश पाटोळे या तरुणाच्या शस्त्रक्रियेसाठी मीडिया व सोशल मीडियावरील आवाहनंतर केवळ दोन दिवसांत तब्बल १ लाख रुपये आर्थिक मदत जमा झाली आहे मात्र अद्यापही आर्थिक मदतीची गरज असल्याने समाजातील दानशूर मंडळीने प्रूढे येण्याची गरज आहे तरी समाजातील दानशूर मंडळींनी मदत करावी असे आवाहन पाटोळे कुटुंबियांनी केले आहे राहूरी फॅक्टरी येथील कुठलेही सामाजिक अथवा धार्मिक काम असो त्यात हिरिरीने भाग घेणारा राहूरी फॅक्टरी येथील डॉ तनपुरे कारखाना कॉलनीतील रहिवासी संदेश सुहास पाटोळे यास फुफ्फुसे रक्तवाहिनीत ढकलली गेलेली व रक्त प्रवाहास अडथळा निर्माण झाल्यामुळे गेल्या १६ दिवसापासून त्रस्त आहे त्याच्यावर नगर येथील साई एशियन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून आजतागायत संदेशचा वैद्यकीय खर्च 3 लाख ५० हजार इतका झाला आहे संदेशच्या कुटुंबियांनी हा खर्च केला. मात्र याचवेळी वैद्यकीय सूत्रांनी २ लाख ५१०००० रुपये पुढील शस्त्रक्रियेसाठी खर्च सांगितला साहजिकच संदेशच्या कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनंतर दोन दिवसांत तब्बल १ लाख रुपये आर्थिक मदत समाजातील दानशूर मंडळीनी संदेशचा बंधू अमोल याच्या खात्यावर जमा करत आधार दिलि मात्र संदेशला प्राप्त झालेली मदत ही निश्चित उपयोगी पडली असली तरी संदेशला हॉस्पिटलमधील त्या नको असणार्‍या त्रासाठून बाहेर काढण्यासाठी अजूनही आर्थिक मदतीची गरज असल्याने समाजातील दानशूर मंडळी सामाजीक संघटना यांनी पुढे येण्याची गरज आहे.

राहुरी फॅक्टरी येथील समाजसेवक तथा
वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे
संस्थापक अध्यक्ष वसंत कुंडलिक कदम यांनी या
आगोदर अहमदनगर व पुणे येथील आजाराने
ग्रस्त असलेल्या तरुणांसाठी सोशल मीडियावर
आवाहन करून आर्थिक मदतीचे आवाहन केले
असता त्यास प्रतिसाद देत थरघोस मदत सदर
कुटुंबाला मिळवुन देण्यात खारीचा वाटा उचलला
आजही संदेश पाटोळे आजाराने त्रस्त असलेल्या
तरुणाच्या मदतीसाठी सर्वप्रथम वसंत कदम यांनी
सोशल मीडियावर तसेच’ आवाज जनतेचा’ या
पोर्टलद्वारे आवाहन करण्यात आले त्यास मानवता
धर्म पाळणाऱ्या दानशूर मंडळींनी मदत केली.
मात्र संदेशला अजून मदतीची गरज असून नववर्ष
स्वागत व अन्य गोष्टींवर खर्च न करता संदेशला
नवजन्य मिळवून देण्यासाठी सर्वानी प्रढे यावे असे
आवाहन वसंत कदम तसेच रारी फॅक्टरी
परिसरातील सामाजिक संघटना यांनी केले
आहे

कृपया खाली संदेश च्या भावाचा अकाउंट नंबर व इतर
बँक संदर्भातील माहिती दिलेली असून आपण मदत थेट
त्यांच्या बॅक खात्यामध्ये पाठवू शकता.

Phone pay Or Google pay No
*9960335909(Amol Patole )*

Bank Details

Bank Account Details : 37128751198
IFSC Code : SBIN0011131
Account Holder name : Amol Suhas Patole
Bank Name : State Bank Of India
Branch : Deolali Pravra

संपर्कासाठी माहिती’
फोन क्रमांक: 9960335909,9890850488

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here