श्रीरामपुर/प्रतिनिधी (संदिप आसने) :- तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या २७९ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १५ जानेवारी रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दि ३० डिसेंबर रोजी एकूण ११०९ अर्ज दाखल करण्यात आले,ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी अडचणीच्या तक्रारी वाढल्याने काल अंतिम टप्प्यात ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिल्याने आज सायंकाळी उशिरा पर्यंत अर्ज दाखल करण्यात आले.

आज दिवसभरात बेलापूर बुद्रुक ८३,कारेगाव ६४,पडेगाव ६२,गोंडेगाव २६,खानापूर ११,सराला ११,गोवर्धन १३,मातापुर ४२,टाकळीभान ३२,निपाणी वडगाव ३२,वडाळा महादेव १६,बेलापूर खुर्द १२,भेर्डापूर १३,लाडगाव ९,मालुंजा बुद्रुक २९,वळदगाव १९,खोकर २०,मुठेवाडगाव ४१,गळनिंब १४,ब्राह्मणगाव वेताळ २४,एकलहरे १९,महांकाळ वाडगाव २४,घुमनदेव ७,नायगाव २२,मांडवे १५,कुरनपुर १६,मातुलठाण ७ असे एकूण आज शेवटच्या दिवशी उशिरापर्यंत ११०९ अर्ज दाखल करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here