रांजणखोल(वार्ताहर) राहाता तालुक्यातील रांजणखोल परिसरात महावितरणने गेल्या काही महिन्यांपासून वीजभारनियमन केले आहे यामध्ये शेतीसाठी व घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी काहि तास वीजपुरवठा करण्यात येतो एक आठवडा दिवसाचा व एक आठवडा रात्रीचा असे वेळापत्रक करण्यात महावितरणकङुन करण्यात आले आहे परिसरात बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातला असल्याने रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत त्यातच मोटार सुरू करण्यासाठी रात्री जाणे म्हणजे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. त्यातच थंडीचा कडाका असल्याने आणखी कठीण झाले आहे रात्री होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे गहू, कांदे या पिकांना अंधारात पाणी भरणे अवघड होऊन बसले आहे. भारनियमन असले तरी वीजपुरवठा सुरळीत नसतो या काळात देखील अनेकदा वीज जाते त्यामुळे शेतीला पूर्ण आठ तास देखील वीजपुरवठा होत नाही यावर कळस म्हणजे ही वीज अत्यंत कमी दाबाने मिळत असल्याने विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे त्याचबरोबर रोहित्र पण जळत आहे तर अनेक ठिकाणी जादाभार झाल्याने रोहित्र जळत आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने मोटारी कमी पाणी देतात. परिणामी भरणे होत नाही. यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी बरी आहे.मात्र, महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे विहिरीत पाणी असून देखील विजेअभावी पिके जळण्याची वाईट वेळ शेतकरी बांधवावर आली आहे यातुन मार्ग काढण्यासाठी पूर्वीप्रमाणेच विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी रांजणखोल येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाषराव गायकवाड यांनी केले आहे वाड्यावस्त्यांवर रात्री अंधार होणारी नाही. याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेऊन रात्रीचे अन्यायकारक भारनियमन त्वरित बंद करावे यावर्षी पाऊस जादा झाल्याने विजनिर्मिती भरपुर होत आहे रांजणखोल परिसरात काही ठिकाणी विज असते व काही ठिकाणी विजेचे भारनियमन आहे त्यामुळे पाणी आसुनही पाण्याची टंचाई मोठया प्रमाणात भासत आहे रांजणखोल जवळील असलेले एमआयडीसी सबस्टेशन ला विजकनेक्शन जोडण्यात यावी ममदापुर सबस्टेशन वरील विजजोङणी बंद करुन वीजपुरवठा सुरळीत करावा महावितरणकङुन नागरिकांची गैरसोय दुर करण्यात यावी लवकरात लवकर पुर्वीप्रमाणे वीजपुरवठा रांजणखोल परिसरात सुरु करण्यात यावा महावितरणकङुन नागरिकांची गैरसोय झाल्यास रास्ता-रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा गायकवाड यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here