श्रीरामपुर/प्रतिनिधी : श्रीरामपुर शहरातील तरुण सामाजिक कार्यकर्ते गणेश दिवसे यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या श्रीरामपुर शहर अध्यक्ष पदी मनसेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली.

गणेश दिवसे हे सामाजिक कार्यात तसेच हिंदू सण उत्सव साजरे करण्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे श्रीरामपुरात शहरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडी बद्दल त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगीतले की,सन्मानिय राज ठाकरे यांना अभिप्रेत असलेले लोकसेवेचे काम माझ्या हातून प्रामाणीकपणे घडेल व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीसाठी
विशेष प्रयत्न करीन.

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा सरचिटणीस संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, मनविसे जिल्हाध्यक्ष उदय उदावंत, मनविसे शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, शहर संघटक निलेश सोनवणे, शहर उपाध्यक्ष संतोष आवटी, बाबासाहेब भालेराव, तालुका मनविसे सरचिटणीस सोमनाथ कासार, मनविसे शहर सरचिटणीस संकेत शेलार, मनविसे उपशहर अध्यक्ष मृत्युंजय रुद्राक्ष आदी मनसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here