श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर नगरपालिकेचे नगरसेवक रवी (आण्णा) पाटील यांचा वाढदिवस हा सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या महामारीमुळे अत्यंत सोपे पध्दतीने साजरा करण्याचे योजले होते परंतु त्यांच्या वरील प्रेम मुळे नगरसेवक रवी (आण्णा) पाटील मित्र मंडळ यांनी त्यांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या पध्दतीने जल्लोषात साजरा करण्यात आला.

३१ डिसेंबर रोजी नगरसेवक रवी (आण्णा) पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व स्तरातून राजकीय व सामाजिक अशा श्रीरामपुरातील ग्रामीण व शहराच्या कानाकोपऱ्यातुन जनसमुदाय उसळुन पडला व त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. तसेच शिरसंगाव व इंदिरानगर मित्र मंडळातर्फे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या ठिकाणी श्रीरामपुरच्या लोकप्रिय नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष लकी शेठी, पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पटारे, भाजपा ओबीसी आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश (आण्णा) चित्ते, मनसेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मा. नगरसेवक भरतशेठ कुंकूलोळ, प्रवीण फरगडे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर, आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मा. सरपंच गणेश मुदगुले, अल्तमास पटेल, खा. ग्रा. उद्योगचे चेअरमन सागर भागवत, प्रसाद सातुरे, सिध्दांत भैया साळवे, सिध्दार्थ सोनवणे, मा. नगरसेवक राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये, अभिजित कुलकर्णी, राहुल लबडे, भरत शिंदे, आशिष सिंग, अक्षय शिंदे, सुजित बडाख, उमेश पवार,मयुर हापसे, सचिन थोरात,आकाश बर्डे, तोसिफ खान, शैलेश शिंदे, जिशान शेख, राजु बानेदार, अर्जुन अदिक, शिवम महाले, विनोद वाघमारे, व राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आदीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या