श्रीरामपुर/प्रतिनिधी : सक्षम फाऊंडेशन श्रीरामपूर वतीने आयोजित मा. जनसेवक रितेश भाऊ एडके यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवक चषक २०२१ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन लोकप्रिय आमदार मा. श्री. लहुजी कानडे साहेब यांच्या हस्ते तर श्रीरामपुर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ जानेवारी रोजी प्रभाग क्र. ४ पठाण वस्ती येथे झाला याप्रसंगी मान्यवर श्री. सचिनभाऊ गुजर, श्री. ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे, श्री. मनोजभाऊ लबडे (नगरसेवक), श्री. विलासजी ठोंबरे, श्री. रितेश (आबा) रोटे (नगरसेवक), श्री. शहाबाज पटेल, श्री. अशोक साळवे, विजय बोर्डे (सर), अँड. अजय पाठक, मजीदभाई शेख, मुरादभाई पठाण, अविनाश शिरसाठ, दीपक कदम, सुरेश ठुबे, सनी मंडलिक, मोहनभाऊ आव्हाड, सलीमभाई शेख, सुनील मगर, बाबासाहेब मिसाळ, राकेश दुशिंग, संतोष वायकर, सचिन वायकर (जय मल्हार ग्रुप संस्थापक अध्यक्ष), चंद्रकांत वायकर, दीपक अडागळे, व प्रभाग क्र. ४ भागातील महिला, पुरुष, लहान थोर यावेळी उपस्थित होते.

श्रीरामपुर तालुक्यात होणार्‍या या स्पर्धेसाठी प्रथम विजेत्या संघास १५ हजार १ रूपये रोख व चषक द्वितीय विजेत्या संघास ९ हजार १ रुपये रोख व चषक तृतीय विजेत्या संघास ६ हजार १ रुपये व चषक तर उपविजेत्या संघास ४ हजार १ रूपये व चषक दिला जाणार आहे. या शिवाय मॅन ऑफ द सिरीज अंतिम सामन्यातील मॅन ऑफ दि मॅच साठी चषक अशी व्यक्तीगत बक्षीसे दिले जाणार आहेत.

सर्व बक्षीसे फायनल झाल्यानंतर वितरीत करण्यात येणार असुन या स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन सक्षम फाऊंडेशनच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here