श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरातून बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत महाराष्ट्रात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात आले. त्यात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याने चांगली कामगिरी बजावली आहे. या महिन्याभराच्या काळात ८५ मुले, महिला आणि पुरुष यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहिमेतील या यशाबद्दल आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना गौरविण्यात आले.

‘ऑपरेशन मुस्कान’ मध्ये महिला आणि मुले यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. नगर जिल्ह्यामध्ये हरवलेल्या महिला, पुरुष आणि अपहरण केलेली किंवा बेपत्ता झालेली मुले यांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.’ऑपरेशन मुस्कान’ दरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १० लहान मुलांच्या अपहरणांचे गुन्हे दाखल असून त्यापैकी ४ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्याचबरोबर १३७ व्यक्ती हरवल्या होत्या. त्यापैकी ८१ जणांचा शोध घेण्यात आला आहे. ७८ महिलांपैकी ५२ तर ५९ पुरुषांपैकी २९ जणांचा शोध घेण्यात आला आहे. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये ८५ बालके, महिला, पुरुष यांचा शोध घेण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपुर) श्रीमती दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सुरवाडे, पोलीस नाईक संजय दुधाडे, पोलीस नाईक दत्तात्रय दिघे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राधा टोपे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोकळ, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बारसे यांना गौरविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here