श्रीरामपुर (वार्ताहर) – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून श्रीरामपुर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाळंदे यांनी बांधले शिवबंधन हाती बांधले आहे.

श्रीरामपुर शिवसेना नेते व मा. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहर प्रमुख सचिन बडदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते. शिवसेना हा जनमानसातील तळागाळातल्या प्रत्येक घटकास सोबत राहात समाजकारण करणारा पक्ष असून केवळ आणि केवळ शिवसेनाच सामान्य माणसाला न्याय देऊ शकते व श्रीरामपुरात शिवसेनेचे काम मोठ्या प्रमाणात आहे म्हणूनच आज मी हातामध्ये शिवबंधन बांधले आहे! अशी खणखणीत प्रतिक्रिया प्रवेश करताना सामाजिक कार्यकर्ते सचिन पाळंदे यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉ. महेश शिरसागर, उपजिल्हाप्रमुख योगेश बोरुडे, विभाग प्रमुख रमेश घुले विभाग प्रमुख किशोर फाजगे, यासीन सय्यद, रोहित भोसले, सागर हारके गोटू उर्फ प्रवीण शिंदे हे उपस्थित होते.