माळवाडगाव/प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळा येथे शेती महामंडळाने औरंगाबाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेल्या शेतजमिनी धनदांडग्या उद्योजकांना कसण्यासाठी करार पद्धतीने दिले आहे मात्र या जमिनी इरिगेशन विभागाने पाटपाणी देऊ नये असे निवेदन अकारि पडित शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने आज इरिगेशन विभागाच्या श्रीरामपूर कार्यालयात दिले आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील आकारीपडित शेतकऱ्यांची सुमार७००० एकर शेतजमीन ही शेती महामंडळाच्या ताब्यात आहे या जमिनी मिळविण्यासाठी आकारी पडित शेतकऱ्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आकारी पडीक नेते गिरीधर किसनराव आसने यांनी रिट पिटीशन नंबर 12563/ 2020 दाखल केलेले आहे त्यासंदर्भात न्यायालयात देखील शेती महामंडळाच्या वतीने सदर जमिनी या कोणालाही ताबा देणार नाही असे अभिवचन देण्यात आले आहे तरीदेखील सदर जमिनी मधील काही जमिनी या धनदांडग्या उद्योजकांना कारर पद्धतीने देण्यात आले आहे मात्र या जमिनी मध्ये इरिगेशन विभागाने पाटपाणी देऊ नये तसेच हरेगाव मळ्याच्या ऐ,बी व सी ब्लॉकची इरिगेशन कडे भरपूर थकबाकी आहे ,त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना इरिगेशन कडून जसे थकबाकी असल्यास ७ नंबर फार्म नामंजूर केले जातात तसेच नियम लावले जावे व त्याच पद्धतीने या करार उद्योजकांना देखील तसेच नियम लावून पाटपाणी मागणी अर्ज इरिगेशनने ना मंजूर करावा तसेच या ऊद्दोजकानां इरिगेशनने पाणी दिल्यास हा उच्च न्यायालयाचा अवमान होईल व त्यामुळे आम्हाला इरिगेशन विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करावी लागेल असा इशारा देखील या निवेदनामध्ये देण्यात आला आहे या निवेदनावर शेतकरी संघटनेचे शरद आसने,संपतराव मुठे,दिलीप हुरुळे,बाळासाहेब आसने माळवाडगाव ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब काळे आदींच्या सह्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here