औरंगाबाद ला जाणाऱ्या एसटी बस वर छत्रपती संभाजी नगर नावाचे फलक चिटकवून औरंगाबाद चे नामकरण छत्रपती संभाजी नगर करावे या साठी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वा खाली आंदोलन करण्यात आले.

हिंदवी स्वराज्याचे रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद शहराला येत्या 26 जानेवारी पर्यंत देण्यात यावे या साठी श्रीरामपूर येथील एसटी बस स्थानकातील औरंगाबाद कडे जाणाऱ्या एसटी बसेस वर छत्रपती संभाजी नगर नावाचे फलक लावण्यात आले या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की क्रूर सैतानी वृत्तीच्या औरंगजेबाने हिंदुस्थानातील हिंदूंना गुलाम बनवून अत्याचार केले, आया-बहिणींची अब्रू लुटली, अनेक हिंदूंची मंदिरे पाडले, हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले हिंदू रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या केली. अशा सैतानाचे नाव महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराला असणे म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि अशा सैतानाच्या नावाचे समर्थन करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री यांचा तीव्र शब्दात निषेध करून म्हणाले की येत्या 26 जानेवारी पर्यंत औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज नगर झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण नगर जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची महाराष्ट्रातील आघाडी सरकारने औरंगाबाद महानगरपालिका येथील सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले.

आंदोलन प्रसंगी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो ,या आघाडी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध करणाऱ्या आघाडी सरकार व त्यांच्या मंत्र्यांचा निषेध असो. अशा घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे ,जिल्हा सचिव तुषार(तात्या) बोबडे, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहराध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाट, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ येळे, शहर सरचिटणीस रोहित जोंजाळ, तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, कामगार सेनेचे नंदू भाऊ गंगावणे, विद्यार्थी सेना तालुका सचिव विकी राऊत, विद्यार्थी सेना तालुका संघटक आतुल तारडे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब भालेराव, लखन कडवे, ज्ञानेश्वर काळे, मृत्युंजय रुद्राक्ष ,विद्यार्थी सेना शहर सरचिटणीस संकेत शेलार, उपशहर अध्यक्ष रतन वर्मा, प्रमोद शिंदे, विभागाध्यक्ष मारुती शिंदे, बजरंग शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here