श्रीरामपुर/प्रतिनिधी – विना मास्क बाहेर फिरणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचं काम पालिका व पोलीस संयुक्तपणे करत आहेत. मात्र, विना मास्क फिरणा-या नागरिकांवर पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिक नाखुश असल्याचे चित्र आहे. तसेच, पोलिसांनी आता गुन्हेगारांचा बंदोबस्त करायचा का विना मास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई करत फिरायचं असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. शिवाय आकारण्यात येणारा दंड देखील अधिक असल्याची तक्रार सामान्य नागरिक करत आहेत.

श्रीरामपुर शहरात विना मास्क बाहेर फिरणा-यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी थूंकणा-यांवर नगरपालिकेने बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कारवाई करुन दंड वसूल करण्याचे काम पोलीस व नगरपालिकेचा आरोग्य विभाग करत आहेत. मात्र, विना मास्क फिरणा-यावर कारवाईचे काम पोलिसांकडे सोपवले असल्यामुळे नागरिक नाखूष आहेत. कारण पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे सोडून विना मास जाणाऱ्या वर कारवाई करत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे काही पोलीस कर्मचारी खाजगीत म्हणत आहेत.

रोज सकाळी श्रीरामपूर येथील शिवाजी चौक येथे व शहर पोलीस स्टेशन समोर म्हणजेच पोलिसांचा सहारा घेऊन जे नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी विना मास्क फिरणा-या नागरिकांना पोलिस कारवाईचा धाक दाखवून 200 रुपये ची पावती पडतात तेच आधिकारी संध्याकाळी गावभर विना मास्क फिरत असतात व तसेच गाई छाप गुटका पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थूकत असतात सकाळी समाजाला शहाणपणा शिकवणारे अधिकारी स्वतः संध्याकाळी बेशिस्तपणे वागून स्वतः शेन खात असतात अशा बेजबाबदार व कायद्याचे उल्लंघन करणारे नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर शिस्तभंगाची कारवाई व्हावे व तसेच नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर गोरगरीब लोकांकडून आम्ही दंडाच्या नावाखाली पैसे वसूल करून देणार नाही अधिकाऱ्यांना एक न्याय नागरिकांना एक न्याय असे आम्ही चालून देणार नाही असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मनसे शहराध्यक्ष गणेश दिवसे म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here