जनसेवक मा. रितेशभाऊ एडके यांच्या वाढदिवसानिमित्त

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोविड-19 कोरोनाच्या काळात लॉकडाऊन आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपवून व आपल्या कार्याप्रति एकनिष्ठ राहून उदान्त हेतूने समाजाला आरोग्य सेवा पुरविलेल्या आशा सेविका, आरोग्य सेविका व डॉक्टर यांचा मानवता हा धर्म जपणाऱ्या कार्याची दखल घेऊन कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याकरिता सक्षम फाऊंडेशन श्रीरामपूर तर्फे कोविड योद्धा, देवदूत हा पुरस्कार सन्मानपत्र व साडी हे देण्यात आले.

या पुरस्काराचे व सन्मानपत्राचे मानकरी डॉ. तोफिक रफिक शेख, सौ. शालन मॅचिंद्र ढोकणे, मा. शहनाज मिर्झा, सौ. सविता विलास पठारे, सौ. अग्नेस उदय कोळगे, सौ. ज्योती गुलदगड, सौ. वैशाली साळवे, श्रीमती. छाया गोरख राऊत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती श्रीरामपूर न.प. चे उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे तर रि.पा.ई चे जिल्हाध्यक्ष मा. श्री. सुरेंद्र थोरात व काँग्रेस नेते सचिन गुजर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेस चे युवा शहर अध्यक्ष श्री. अभिजित लिपटे, मनोज लबडे (नगरसेवक), विलासभाऊ ठोंबरे, भाजपचे प्रकाश चित्ते, आर पी आय चे भीमा बागुल, विशाल यादव, विजय बोर्डे, अशोक साळवे, आकाश सूर्यवंशी, मोहन आव्हाड, सलीम शेख, युवा पत्रकार समीर माळवे, भीमाभाऊ बागुल, संतोष शरणागत,हे मान्यवर उपस्थित होते.

तर सक्षम फाऊंडेशन चे अध्यक्ष सुशील पठारे व सचिव श्री. रितेश एडके आणि सक्षम फाऊंडेशनचे सर्व सदस्य व सिद्धार्थ नगर भागातील सर्व नागरिक महिला मंडळ उपस्थित होते. तर सूत्रसंचालन सुशील पठारे यांनी केले तर आभार रितेश एडके यांनी मांनले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here